
प्रतिनिधी:नितेश ताजणें
सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई याच्या समाज कार्याची जोरदार परिसरात चर्चा
झरी -जामनी तालुक्यातील येडसी या गावातील कोरोना ग्रस्त रुग्णाची रात्री अचानक ऑक्सिजन लेवल कमी झाली असता तो रुग्ण आणि त्याचे नातेवाईक हे परिसरात व रुग्णालयाकडे रुग्णवाहिका साठी प्रयत्न करत होते यातच त्या रुग्णाला रुग्णालयात न्याला कुणी तय्यार नसताना हीच माहिती अडेगाव येथील सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई व त्याच्या सहकर्यांना माहिती पडली असता त्यांनी रुग्णवाहिकेसाठी अनेक प्रयत्न करून रुग्णवाहिका काही मिडेना मग त्यांनीच निर्णय घेतला की आपणच पी ,पी,इ किट घालून आपल्याच चार चाकी वाहनाने त्या रुग्णाला ऑक्सिजन लावायला आदीलाबाद येथे न्यायच मग काय सामजिक कार्यकर्ते मंगेश आणि त्याच्या सहकार्यांनी चक्क पी,पी,इ किट घालून स्वतःच्या खर्चाने येडसी या गाव वरुन त्या रुग्णाला घेऊन तात्काळ आदीलाबाद गाठले व त्या ऑक्सिजन लेवल कमी झालेल्या कोरोना रूग्णावर आदीलाबाद येथील रुग्णालयातऑक्सिजन बेड उपलब्द करून त्याच्या प्रकृतीवर इलाज सुरू आहे
याच सामजिक कार्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे की परिसरातील अनेक राजकीय नेते कोरोना ने लपून बसले असताना सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई सारख्या तरुणाची आज समाजाला खरच गरज आहे
