
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी
अश्या अनेक कारवाया पचवणारा “प्रवीण” पोलिसांचे हातावर तुरी देऊन फरार
वणी :
कोरोनाच्या काळात अवैध व्यवसायीकांनी चांगलेच “हात पाय” धुने सुरु केले असुन अवैध मार्गाने मिळेल तेवढी कमाई करण्याची जणु संधीच साधुन घेत आहे.अशाच एका संधिसाधुने कोरोना काळात सिल लावण्यात आलेल्या बार अँड रेस्टारंट मधुन अवैद्य दारू पुरवठा केल्याच्या कारणावरून त्या बार वर धाड टाकुन १लाख ८५ हजार ७४० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे. मात्र अशा अनेक कार्यवाह्या पचवणारा “प्रविण” पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला आहे.
गुप्तदाराच्या खबरीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या पथकाने वणी-वरोरा मार्गावरील वादग्रस्त व्ही.व्ही.बार अँड रेस्टारंट समोर धाड टाकून एकाला अटक करून १ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई सोमवारी सायंकाळी ४ ते ५ वाजताचे सुमारास करण्यात आली.
लॉकडाऊन काळात सर्व बिअर बार आणि दारू भट्ट्या बंद आहे, तसेच दारूबंदी विभागामार्फत सील सुद्धा करण्यात आल्या आहेत.परंतु कोरोना सारख्या महामारीच्या काळात सुद्धा पैश्यांची हाव असलेले बीअर बार मालक अनेक नवनवीन शकला लढवून अनेक मार्गाचा वापर करून दारू विक्री करताना दिसत आहे.
अनेकदा कारवाई होऊन सुद्धा न जुमानता अवैध विक्री करणाऱ्या व यांचे हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्या बार मालकाला पोलीस बाजीराव दाखवतील का सर्वात मोठा प्रश्न आहे. तसे झाले तरच हे समोर हिम्मत करणार नाही. यापूर्वी या प्रवीण सरीदेणे अश्या अनेक कार्यवाह्या पचवल्या आहे हे विशेष…
कोरोना काळात आम्ही सर्व बार सील केले : दारूबंदी विभाग.
कोरोना काळात पहाटे पासून तर संध्याकाळ पर्यंत लालपुलिया पासून दामले फैल ते शास्त्रीनगर पर्यंत सर्वच बार आणि भट्ट्या जवळ अवैद्य दारू मिळते या विरोधात कधीही दारूबंदी विभाग कारवाई करतांना दिसून येत नाही.पोलिसांनी
कारवाई केली आम्ही सील केलेला साठा चेक करू.आम्ही कुठे कुठे लक्ष देणार.आमची जवाबदारी नाही: दारूबंदी अधिकारी वणी.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गुप्तबातमीदाराकडुन खात्रीलायक खबरेवरून वणी ते वरोरा रोड सावरला येथील येथील व्हि व्हि बार ॲन्ड रेस्टॉरन्ट येथुन कार इंडीका डीएलएस कंमाक एमएच-३४ के ४५०१ ची पंचासमक्ष झडती घेतली असता सदर वाहनात बि-७ कंपणीचे प्रत्येकी ७५० एमएल असे एकुण २३ नग बंपर कि.अं १५,६४०/-,ब्लेंडर स्प्लाईट कंपणीचे २ लिटर चे एकुण ६ नग प्रत्येक कि. ३३५० असे एकुण २०१००/- व कार इंडीका डीएलएस कंमाक एमएच-३४-के- ४५०१ चे वाहन कि.अं. १,५०,०००/- असा एकुण १,८५,७४०/- जप्त करून ताब्यात घेण्यात आले दारू विकताना अविनाश सुधाकर सोनावने वय २६, वणी यास अटक करण्यात आली असुन आरोपी बार मालक, प्रविण सरोदे, हा पोलिसांचे हातावर तुरी देऊन पळून गेला.दारूबंदी विभागाशी असलेल्या मधुर संबंधाने प्रवीण ला पळून जाणे सोपे झाल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे. प्रवीण सरोदे यांची गाडी, कंमाक एमएच-३४-के- ४५०१ जप्त करून यांचे विरूध्द गुन्हा नोंद करून कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही मा. डॉ दिलीप पाटील – भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात श्री सचीन लुले सपोनि पोस्टे शिरपुर नापोका / विजय वानखडे, प्रदीप ठाकरे, ईक्बाल शेख, रवि इसनकर, परेश मानकर, संतोष कालवेलवार तसेच राज्य उत्पादन शुल्क श्री दुय्यम निरीक्षक सुर्वे, सतीष घाडगे यांनी केली आहे.
