धक्कादायक:मुकुटबन ग्रामपंचायतच्या उपसरपंच तंटामुक्त समिती अध्यक्षासह आठ जणांवर विनयभंगासह दंगलीचे गुन्हे दाखल

  • Post author:
  • Post category:वणी


पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने पीडित महिलेची न्यायाल्यात धाव
न्यायालयाच्या आदेशाने आरोपी वर गुन्हे दाखल
तालुका ,झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतच्या उपसारपंच तंटामुक्ती अध्यक्षासह आठ जनावर विनयभंगासह दंगलीचे गुन्हे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
२३ ऑक्टोबर रोज सकाळी ११.३० वाजता एक महिला स्वताच्या खुली जागा साफसफाई करीत असताना आरोपी महर्षी ऋषी मूर्तीच्या पूजनाकरिता आले असता पीडित महिलेने तुमची मूर्ती उचलून तुमच्या जागेवर ठेवा व पूजा करा असे म्हणताच आरोपी उपसरपंच अनिल कुंटावार, तंटामुक्त समिती अध्यक्ष रविंद्र कापणवार सह राजेश्वर कुंटावार,मधुकर जींनावार, पोतंना मंदुलवार,अंकुल गोंनलावार,संतोष मंदुलवार,गजानन कुंटावार,सत्यनारायण कुंटावार व शोकराम मंदुलवार यांनी सहमत करून गैरकायदेशीर मंडळी जमऊन वाईट उद्देशाने महिलेचा हात पकडून विनयभंग केला व तिच्या पाटील मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली व जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिला व तिचा पती मारहाणीतून कसेबसे बचावून मुकुटबन पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार दिली. तक्रारींवर कोणतीही कार्यवाही न केल्याने पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली परंतु तेथेही न्याय न मिळाल्याने अखेर पीडित महिलेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असा आरोप पीडित महिला व तिच्या पतीने केला . न्यायालयाने वरील सर्व आरोपीवर कलम १४३,१४६,१४७,१४९,२९४,३२३,३५४ व ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश करताच ८ जानेवारीच्या रात्री २ वाजता दरम्यान गुन्हे दकगल करण्यात आले.
गुन्हे दाखल होताच गावात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अजूनपर्यंत अटक करण्यात असले नसून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार करीत आहे.