
. मुकुटबन येथे हिंदुस्थान स्काऊट आणी गाईड व आदर्श हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या संयुक्त विधमाणे रोव्हर आणि रेंजर च्या टीम कडून संविधान दिवस मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला हिंदुस्थान स्काऊट आणि गाईड व शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकाने संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले या वेळी शाळेचे प्राचार्य उमेश उत्तरवार यांनी संविधान उद्धेश समजावून सांगितले व त्याच बरोबर 26-11-2008 रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्यात 22 जवान शहीद झाले त्यांचा प्रतिमेला मेणबत्ती लावून श्रद्धांजली देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी ग्रामपंचायत उपसरपंच अनिल कुंटावर, गजानन उत्तरवार, संतोष कुरमिलवार हे होते तर कार्यक्रमचे अध्यक्ष स्थान शाळेचे प्राचार्य उमेश उत्तरवार यांनी भूषिविले या कार्यक्रमाचे आयोजन हिंदुस्थान स्काऊट आणी गाईड चे जिल्हा संघटना आयुक्त नितीन मनवर, जिल्हा प्रमुख राहुल निमसरकार, संतोष गुमुलवार, जगदीश कुडलवार राजू कांबळे व शाळेचे सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी हे उपस्थित होते आभार प्रदर्शन राठोड यांनी केले
