
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
यवतमाळमध्ये सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम असताना आर्णी रोड परिसरात पल्लवी लॉन जवळ दोन अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.पल्लवी लाॅनच्या एका बाजूला एका व्यक्तीचा युवकाचा मृतदेह तर दुसर्या गेट समोर एका व्यक्तीचा मृतदेह आढळले असून घटनास्थळी पोलिस हजर झाले आहे.
ही घटना नऊ ते दहाच्या वाजताच्या सुमारास घडल्याचे परिसरातील चर्चा सुरू आहे. वसीम पठाण, उमेश येरमे दोघेही रा. नेताजीनगर अशी मृतांची नावे असल्याचे कळते
