
राजुरा 15 ऑक्टोंबर
सामाजिक कार्यकर्ते निखिल कावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाघोबा साखरी येथील डोळ्यांनी दिव्यांग असलेले दिलीप झुंगरे यांना धान्याची किट देऊन वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या कार्यात राजुरा येथील छावा फाउंडेशन ने पुढाकार घेतला.
छावा फाउंडेशन राजुरा तर्फे मित्र परिवारातील सभासदांचा वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रम साजरे करून करण्यात येतो. निखिल कावळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्य किट वाटप घेण्यात आले. यावेळी छावा फाऊंडेशनचे अध्यक्ष आशिष करमरकर, उपाध्यक्ष बबलू चव्हाण, सचिव आकाश वाटेकर, कोषाध्यक्ष संदीप पोगला, सहसचिव रंजित उगे अमोल राऊत रखिब शेख प्रशांत वाटेकर, देवकिशन वनकर, सुजित कावळे, कुणाल पिंपळशेंडे, लोकेश बुटले अभय हनुमंते विकास वाटेकर प्रफुल बोबडे, गोपाल गुरनुले ,प्रणय बोबडे,विलास आवारी, उपस्थिती होती.
