महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे: विद्याताई मोहनभाऊ लाड

  • Post author:
  • Post category:इतर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील महिलांना आधार व सहकार्य, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे तसेच महिलांचे सबलीकरण करण्याचे काम चाचोरा येथील समाजसेविका विद्याताई मोहनभाऊ लाड ही सर्वसाधारण महिला करीत आहे. तसेच महिला सबलीकरणासाठी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे असे आवाहन त्या नेहमी करित असतात.
वडकी वाढोणा खैरी या परिसरात महिलांचे सबलीकरणाचे काम सतत कोणत्या ना कोणत्या कामातून विद्याताई लाड यांच्या कडून सुरु आहे. त्यासाठी त्यानी परिसरातील महिलांना एकत्र करुन उमेद व महिला बचत गट निर्माण केला तसेच गटाच्या काम सतत कोणत्या माध्यमातुन शासकीय योजनांचा कोणत्या महिलांना लाभ मिळवून दिला. माध्यमातून विद्या वडकी येथे दुध डेअरीचे निर्माण केले लाड यांच्याकडून अनेक महिलांच्या हाताला उमेद व बचत गटामार्फत काम उपलब्ध करुन दिले. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिने वडकी येथे महिला आरोग्य शिबिर राबवले. कोरोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला. गावात स्वच्छता अभियान राबवले. महिलांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवून प्रशासनाला धारेवर धरले. असे एक ना अनेक कार्य या स्त्री शक्तीने केले. आजही समाजसेविका विद्याताई मोहनभाऊ लाड या हजारो महिलांच्या संपर्कात आहेत.