नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित यांची बदली, पी.आर.पाटील नवे पोलीस अधीक्षक

  • Post author:
  • Post category:इतर

प्रतिनिधी:- चेतन एस. चौधरी

नंदुरबार : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी पी.आर. पाटील यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांत नवीन पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती नवे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिली.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तर कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता नुकतीच हातात नियुक्तीची ऑर्डर मिळाली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत नवीन पदभार आपण स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.