कापसाला मिळाला 8151 भाव,कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव मध्ये लिलाव पद्धतीने कापसाच्या खरेदीचा वेळी शेतकऱ्यांना 8151/- रुपये भाव

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिनांक 25/10/2021 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव मध्ये लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी सुरू झाली त्यामध्ये शेतकऱ्यांना 8151/- रुपये भाव मिळाला. त्यावेळेस बाजार समितीचे कर्तव्यदक्ष सभापती माननीय प्रफुल्ल भाऊ मानकर, संचालक दिपकराव देशमुख ,गोवर्धनराव वाघमारे ,मनीषजी बोरा ,रविभाऊ निवल, सचिव सुजितजी चाल्लावर केंद्रप्रमुख विनोदराव झांबरे इत्यादी उपस्थित होते इतका भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आज 430 वाहन व 85 बैल बंडी होती. व राळेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवाना आनंदमय वातावरण निर्माण झालेले आहे. आणि अशाच प्रकारे भाव राहावे अशी शेतकरी बांधवानची अपेक्षा आहे.