आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन श्रीनगर ते कन्याकुमारी सायकलयात्रा,पर्यावरण संवर्धन संस्था व वडकी समस्त जनतेकडून निसर्गमय शुभेच्छा

.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

श्री. संजयजी खाडे वय ६० यांच्या श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल यात्रेचे आज वडकी येथे सकाळी ८वाजता आगमन झाले.
त्यांच्या या सायकल यात्रेमागील हेतू जाणून घेऊन त्यांचा सत्कार करण्याकरिता पर्यावरण संवर्धन संस्था वतिने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडकी येथील जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक गंभीरराव भोयर, राजेंद्र झोटींग, प्रकाश चिव्हाने, जिवन गोहकार ,देवेंद्र झीले, सचिन कडू, प्रकाश महाजन,किरण ठाकरे
राजेश भोयर सर,माथनकर सर व, जगदीश गोबाडे इत्यादी पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी श्री. खाडे यांनी आपल्या प्रवासातील अनूभव सांगितले.

आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन भारत भ्रमणासाठी निघालेल्या संजय खाडे यांना पर्यावरण संवर्धन संस्था व वडकी समस्त जनतेकडून निसर्गमय शुभेच्छा देण्यात आल्या.