
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील 13 नोव्हेंबर च्या मध्यरात्री नंतर 2 ते 3च्या सुमारास काही अज्ञात इसमांनी पिंपरी येथील आठ बकऱ्या चार चाकी वाहनात चोरी करून पळाल्याची माहिती आहे. या प्रकरणी परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुक्यात बकऱ्या चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे अनुमान वर्तविण्यात येत आहे. पिंपरी दुर्ग येथील बंडूजी कोवे यांच्या गोठ्यातील बकऱ्या चार चाकी वाहनात चोरी करून चोर पसार झाले. बकऱ्या मालकाचे अंदाजे 70 हजारांच्या जवळपास नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ही पहिली घटणा नसून या आधी ही बकऱ्या चोरी गेल्याच्या घटना राळेगाव तालुक्यात घडल्या आहे.
