कोरपना येथे सोयाबीन खरेदीला प्रारंभ

कोरपना – कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना अंतर्गत कोरपना बाजारपेठेच्या मुख्य आवारात बुधवार पासून सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला आहे.
याप्रसंगी कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्रीधरराव गोडे , संचालक मंडळ बाजार समितीचे सचिव कवडू देरकर व बाजार समितीचे कर्मचारी आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी बाजारपेठेत चांगली आवक दिसून आली. ५१६० रुपये प्रती क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करण्यात आली. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कोरपना यार्ड मध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव कवडू देरकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे