उर्मिला व गझल चांदने गझल संग्रहाचे प्रकाशन

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार


कोरपना – गझल मंथन प्रकाशन कोरपना द्वारा महाराष्ट्रातील प्रख्यात गझलकारा उर्मिला बांदिवडेकर यांच्या उर्मिला व डॉक्टर शरयू शहा यांच्या गझल चांदणे गझल संग्रहाचे प्रकाशन कोरपना येथे पार पडले.
या प्रकाशन सोहळयाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव ओम पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य जयवंत वानखडे, प्राचार्य मारोती जूनघरी , पत्रकार संघाचे सचिव जयंत जेनेकर, युवा मंच अध्यक्ष प्रज्योत आवारी, महेश गारघाटे
आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत रामगिरवार , संचालन विपुल साळवे तर आभार भूषण तुरानकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश सुर, नितीन इंगोले, नागार्जुन कोमिनेनी, अक्षय कळसकर व गझल मंथन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.