खळबळजनक घटना, शेतातील मोटर पंप चा करंट लागुन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, सुकनेगाव येथील घटना

  • Post author:
  • Post category:वणी

तालुक्यातील सुकनेगाव येथे एका तरुण शेतकऱ्याचा शेतातील मोटर पंप चा विद्युत करंट लागुन म्रुत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अविनाश विलास निखाडे (२५) रा.सुकनेगाव असे करंट लागुन म्रुत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाशच्या वडीलाचा काही दिवसापुर्वी म्रुत्यू झाला असुन बहिणीचेही लग्न झाले आहे तर अविनाश व त्याची आई हे दोघेच राहत होते. अविनाश ला शेती असल्याने आणि वडील नसल्याने तो शेतीचे काम करायचा, आज दि.३० ऑक्टोंबर ला सकाळी ११ वाजताचे सुमारास अविनाश आपल्या शेतात गेला व चना लागवड करण्यासाठी शेतात पाणी देण्यासाठी म्हणुन शेतात असलेले मोटर पंप सुरु करण्यासाठी गेला असता त्याला ईलेक्ट्रीक मोटर पंप ला असलेल्या करंट चा जोरदार धक्का बसला व तो खाली कोसळला या घटनेची माहिती त्याच्या काकाला कळताच त्यांनी ताबडतोब वणीच्या ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला म्रुत्यू घोषीत केले. या घटनेची माहिती वणी पोलीसांना देण्यात आली आहे. म्रुत्यूदेहावर शवविच्छेदन करण्यात आल्या नंतर म्रुत्यूदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पुढील तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करित आहे.