
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा , राळेगावच्या कार्यकारणीची सभा संघटनेचे अध्यक्ष महेश सोनेकर, ज्येष्ठ सल्लागार तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बबन नगराळे यांचे उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. होतकरू, धडपड, शिक्षका विषयी कामाची तळमळ, जिल्ह्यामध्ये आपल्या कामाची छाप निर्माण करणारे सचिव म्हणून संदीप क्षीरसागर जबाबदारी पार पाडत होते, परंतु त्यांच्याकडे प्रशासकीय कामाची एक मोठी जबाबदारी आल्याने ते सचिव पदावरून बाजूला झाले. त्या पदावर सर्वानुमते अविरोध प्रवीण थूल यांची निवड करण्यातआली. सोबतच महिला आघाडी प्रमुख म्हणून प्रीतीताई वासेकर यांचीसुद्धा अविरोध निवड झाली. सभेमध्ये दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिक्षक समितीच्या विचार धारणेला कधीही तडा जाऊ न देणार असल्याची व शिक्षका प्रति आस्थेने काम करण्याची हमी दिली. दोघांचेही सभास्थळी स्वागत करण्यात आले.
शिक्षक समिती महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठी संघटना असून विचारवंत, बुद्धिवंत शिक्षकांची संघटना आहे. समिती शिक्षक, विद्यार्थी, शाळा यासाठी सतत कार्य करत असतात. हे कार्य करत असताना समाजाचे ऋण म्हणून सामाजिक कार्यामध्ये सुद्धा समिती अग्रेसर असतात. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणाऱ्या संघटनेच्या सचिव पदाची ,जी मला जबाबदारी दिली ,प्रसंगी स्वतःला मी भाग्यवान समजतो.असे मनोगत प्रविण यांनी व्यक्त केले. प्रितीताई यांनी महिला समस्याप्रती मी सदैव पुढे राहील अशी ग्वाही दिली. यावेळी तालुका कार्यकारणी चा विस्तार करून रिक्त पदावर इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.निवड झालेली नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे-तालुका अध्यक्ष-महेश सोनेकर,तालुका सचिव-प्रवीण थुल,कार्याध्यक्ष-विजय दुर्गे,कोषाध्यक्ष- गोविंद धोटे,सल्लागार-गजानन यादव,हेमंत निंबुलकर,किसन चौधरी, संजय खडसे ,विनायक एकोणकर,जिल्हा प्रतिनिधी- देवा वैदय , हरिहर बोके,उपाध्यक्ष-संजय एकोणकर,पुंडलिक देवतळे,मिलिंद अंबलकर,सुनील इंगोले,विनोद भादीकर,भास्कर बाराहाते,तालुका संघटक-विनोद क्षिरसागर, मनोज मानकर,कार्यालयीन चिटणीस-संदिप टुले,प्रसिद्धी प्रमुख-हेमंत सिडाम- प्रसिद्धी सचिव-सागर धनालकोटवार, सहसचिव-अमोल पोहनकर,विशाल किनाके,सहसंघटक -उद्धव चौधरी, भूमन्ना कसरेवार, संजय चौधरी,देवेंद्र,बालपांडे,रामेश्वर लुटे,निमंत्रक- अशोक खेकडे,विनोद उगेमुगे,भगवान ठावरी
पेंशनर सेल प्रमुख- बबन नगराळे,उत्तम अंड्रस्कर
मुख्याध्यापक सेल-बाबाराव घोडे विषय शिक्षक सेल-राजेंद्र खुडसंगे,हरिदास वैरागडे
महिला आघाडी प्रमुख-प्रीती वासेकर परिसर प्रमुख-योगेश गलाट (जळका),सुनील यादव (अंतरगाव),वसंता जुमनाके(झाडगाव),मिलिंद वाठोरे(वाढोना बाजार) ,राहुल बोरडे, (वडकी),सुभाष पारधी (धानोरा),प्रवीण दिडपाये (खैरी), नरेंद्र घाटोळ( सावरखेडा),हनुमान जुमनाके(राळेगाव),योगीराज मेश्राम(वरध), महिला प्रतिनिधी-माधुरी नगराळे,ज्योती मानकर,माया राऊत,मनीषा ताम्हन, रीना चौधरी, जया वाघमारे,कल्पना लाभे,रुपाली कडु ,जयश्री पोटे ,तेजस्वी भगत,दर्शना ताकसांडे, सुरेखा जावळेकर
कार्यकारणी सदस्य -राजकुमार बाराहाते,गजानन वरघडे
अविनाश ठाकरे, अनिल कुंभलकर
या सभेला शिक्षक समितीचे अनेक शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन माजी सचिव संदीप क्षीरसागर यांनी तर उपस्थितांचे आभार संदीप टुले यांनी मानले.
