
आजी सोबत शेतात गेलेल्या दहा वर्षीय ना रानडुक्कराने हल्ला करून गंभीर जखमी केले.त्याला उपचारार्थ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दखल केले . मात्र वैद्यकीय अधिकार्याणी त्याला मृत घोषित केले.
शेतकरी आणि शेतमजुरावर वन्यप्राण्याचे हल्ले होण्याच्या घटना दिवसागणीक वाढ़त असल्याने ग्रामीण भागातील नागरिक भयभीत झाले असल्याचे दिसून येते आहे.
वरोरा तालुक्यातील पाचगांव( ठाकरे ) येथील नयन मारोती कोडपे हा आपल्या आजी सोबत पांढरतळा गांव शिवारातील शेतात गेला होता शेतात रानडुक्कराने नयन वर हल्ला करून गंभीर केले.त्याला टेमुर्डा येथील रुग्णालयात दाखल केले .परंतु ,प्रकृती गंभीर असल्याणे त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मृतकाच्या परिवाराची भेट घेत सांत्वन केले व तात्काळ 20 हजाराची मदत सुपूर्त केली.
