आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आलेले परीक्षार्थी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडकले ,मनसे चंद्रपूर ने जेवणाची व स्वगावी जाण्यासाठी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली बस

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी येऊन चंद्रपुरात अडकलेल्या परीक्षार्थींना मनसेचा_सहारा रात्रीच्या साडे आठ वाजता काल रविवारी राहुलभाऊ बालमवार यांचा फोन आला, की आपल्याला जवळपास दोनशे लोकांचा स्वयंपाक करायचा आहे.
एवढ्या रात्री तेही एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवायचे एकूण आम्हाला धक्काच बसला. परंतु एवढ्या रात्री कशासाठी याची माहिती घेताच एक दुःखद धक्का बसला.
आधीच संशयास्पद आणि गोंधळात सापडलेल्या आरोग्य विभागाच्या ड वर्गाच्या परीक्षा काल होत्या. आपल्या जवळपासच्या जिल्ह्यात परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना जवळपास ५०० ६०० किमी पर्यंतचे परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना देण्यात आले.
वादग्रस्त घडलेली ही परीक्षा आधीसुद्धा रद्द करण्यात आली तर काल झालेल्या परीक्षेचा पेपर सकाळीच परिक्षार्थींच्या व्हाट्सएप वर आल्याची देखील बातमी विद्यार्थ्यांना मिळाली.
या सर्व अडचणींचा सामना करत असतानाच दुसरा धक्का विदयार्थ्यांना रविवारी मिळाला तो म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा.
दुपारी अडीच ते साडे चार पर्यंतचा पेपर देऊन जवळपास २०० २५० विद्यार्थी सायंकाळी चंद्रपूर बसस्थानकावर आले. परंतु एसटी चा संप आहे समजल्याने त्यांच्यासमोर गावी जाण्यासाठी समस्या निर्माण झाली.
परळी, यवतमाळ, नांदेड, आदीलाबाद वरून आलेले विद्यार्थी बस च्या अभावी अडकून पडले यातील काही विद्यार्थ्यांनी खाजगी प्रवास केला परंतु. जवळपास १५० २०० विद्यार्थ्यांना वाहनाचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांनी आपापल्या परिचयाचे मंत्री, आमदार, स्थानिक आरटीओ, जिल्हाधिकाऱ्यांना बस च्या व्यवस्थेसाठी संपर्क करण्याचे प्रयत्न केला परंतु सर्वांकडून फक्त आणि फक्त आश्वासन मिळाले.

अश्यातच झालेल्या या परिस्थितीची माहिती रात्री साडे आठ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार याना मिळताच आपले सहकारी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविष सिंह, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, नितीन टेकाम करण नायर, तुषार येरमे, व शहजाद सय्यद यांच्यासह बसस्थानक गाठत परिक्षारथ्यांकडून सर्व अडचण समजून घेतली. काही विद्यार्थी पास काढून आले तर काहींची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांच्यासमोर जेवणाची अडचण होती, मदतीची हाक देणाऱ्याच्या पाठीशी राजसाहेब नेहमी तत्पर असतात त्यांच्याच विचारांवर चालण्याचा ध्येय घेऊन काम करणाऱ्या राहुलभाऊनी कोणताही विचार न करता रात्री १० वाजतापासून जवळपास १५०-२०० विद्यार्थ्यांची जेवणाची सोय स्वखर्चाने केली व आरटीओ, जिल्हाधिकारी, मंत्री याना माहितीचे आव्हान केल्यानन्तर त्यांच्याकडून दुसऱ्या दिवशी सकाळी मदत करण्याचे आश्वासन मिळाल्याने थंडीत विद्यार्थ्यांचे हाल होईल हे लक्षात घेऊन रात्रीच यवतमाळ पर्यंत जाण्यासाठी त्यांची बसची व्यवस्था स्वखर्चाने करून दिली. मदतीच्यावेळी माणूस माणसात देव शोधतो अश्यातच मनसेने परिक्षार्थींची मदत केली या भावनेनं विद्यार्थ्यांनी मनसे व राहुल बालमवार यांचे आभार मानले, आणि रात्रीच्या ३ वाजता सर्व विद्यार्थ्यांना मनसैनिकांनी रवाना केले.