राळेगाव शहरात सतत दुसऱ्या दिवशी अपघाती मृत्यू ची मालिका,तेरा वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

घरगुती वस्तू खरेदी करण्याकरता स्कूटी ने मार्केट करून परत जात असलेली मुलगी संस्कृती सतीश धुमाळे वय 13 वर्ष हीचा अपघाती मृत्यू झाला राळेगाव वरून वडकी कडे जाणाऱ्या मोठ्या ट्रक TS 22 V8824 या मोठा ट्रक ने तिला जागीच चिरडलेने तिचा जागीच मृत्यू झाला ती मार्कंडे पब्लिक स्कूल सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती आज दिवाळीचा दिवस असल्याने मार्केटमध्ये मोठी गर्दी होती मार्केट जवळूनच राळेगाव येथून चंद्रपूर-वडकी-वर्धा -हिंगणघाट या शहराकडे मोठमोठी वाहने याच मार्गाने जातात याच ठिकाणावरून मार्केट सुरू होते त्याचबरोबर या रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण केले आहे त्यामुळे रस्ता वरुण वाहन काढणेकठीण जाते गर्दीमुळे व वाहनामुळे या मुलीला आपला प्राण गमवावा लागला स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल येथील शिक्षिका वैशाली धुमाळे यांची ती मुलगी होती रस्त्यावर अपघात पाहण्याकरिता बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.