आगित भस्मसात झालेल्या निवासस्थानाच्या बांधणीसाठी आमदार समीरभाऊ कुणावार यांनी केली महिलेस मदत

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

                 

स्थानिक जैन मंदिर वार्ड येथील जैन मंदिराजवळ राहणाऱ्या श्रीमती कृष्णा अंबालाल पाराशर यांचे निवासस्थानाला काल दि.03-11-2021 रोजी रात्री 08.30 वाजता आग लागली. यावेळी संपुर्ण घर तसेच घरातील साहित्य,अन्नधान्य तसेच रोख रक्कमसुद्धा या आगित भस्मसात झाली,यात या महिलेचे जवळपास 3 लाख 50 हजार रूपयाचे नुकसान झाले.
आमदार समीरभाऊ कुणावार यांना या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली.
श्रीमती पाराशर या महिलेचे सांत्वन करीत आ.कुणावार यांनी तीला काही गृहपयोगी साहित्य तसेच जळालेली वास्तु उभारण्याकरीता लागणाऱ्या साहित्याची मदत केली.यावेळी आमदार कुणावार यांचेसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीपजी जोशी, दिनेशराव वर्मा, विजयजी मुत्था, अशोकराव सिंघवी , विजयजी सिंघवी, विजयजी पाराशर ,रितेशजी शर्मा इत्यादी उपस्थित होते.