
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीत कांड (Hinganghat woman ablaze case) प्रकरणात दोन्ही बाजुचा युक्तिवाद संपला आहे. त्यामुळे या प्रकरणात आज (5 फेब्रुवारी 2022) न्यायालय निकाल देणं अपेक्षित होतं. मात्र, या खटल्याचा न्यायालयीन कामकाज पूर्ण न झाल्याने आता 9 फेब्रुवारी रोजी न्यायालय आपला निकाल देणार आहे. जळीतकांड प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे. आता न्याायलय 9 फेब्रुवारी रोजी काय निकाल देतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Hinganghat woman lecturer set ablaze by jilted lover case)वर्धा जिल्ह्यातील (Wardha district) हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणात दोन्ही बाजूने होणारा युक्तिवाद संपल्याने न्यायालयात कामाकाज अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबली होती मात्र पाच फेब्रुवारीला प्रकरणाचा निकाल न्यायालय सुनावणार असल्याच उज्वल निकम यांनी 21 जानेवारीला सांगितलं होत की 5 फेब्रुवारीला निकाल देणार, मात्र या खटल्याचं न्यायलयीन कामकाज पूर्ण न झाल्याने आता 9 फेब्रुवारीला न्यायालय निकाल देईल.
1
