लसीकरण करण्यापुर्वी सर्व युवकांनी व प्रहारच्या कार्यकर्त्यानी रक्तदान करावे – प्रहार जिल्हाप्रमुख जयंत तिजारे याचे आव्हान

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे,

राज्य सरकार कडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार १८ वर्षावरील तरूण पिढिला सुध्दा कोरोना लस देण्यात येणार आहे पहीला लसीचा डोस घेतल्यानंतर ३८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही म्हणजे पुढचे २-३ महिने रक्तदान तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख जयंत तिजारे यांनी मोठ्या प्रमाणात युवकांनी व प्रहार कार्यकर्त्यानी रक्तदान करावे असे आव्हान केले आहे कारण प्रहार जनशक्ती पक्ष रक्तदान व रूग्णसेवेत जिल्ह्यात सदैव अग्रेसर असते म्हणून लस घेण्या अगोदर आपण कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम,आचार्य विनोबा भावे रूग्णालय सांवगी,सामान्य रूग्णालय वर्धा, कींवा प्रहारच्या आयोजित शिबिरामध्ये येऊन रक्तदान करावे आणि मगच लस घ्यावी जेणेकरून भविष्यात निर्माण होणारे रक्ताचे संकट कमी होण्यास मदत होईल व आपल्या रक्तदानाने रुग्णांना मदत होईल तरी आपणास रक्तदान करायचे असल्यास आपले स्थानिक पदाधिकारी तालुका प्रमुख, शहर प्रमुख, रूग्णसेवक,सर्कल प्रमुख, शाखाप्रमुख, याच्याशी संपर्क करावा असे आव्हान जयंत तिजारे याच्या वतिने करण्यात आले आहे…