
राज्य सरकारचे एस टी महामंडळाकडे दुर्लक्ष झाले असून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता शासनाने तात्काळ याची दखल घेऊन कामगारांचा प्रश्न प्राधान्याने सोड़वावा यासाठी मी पाठिम्बा व्यक्त करीत असून शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार समिर कुणावार यांनी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनस्थळी भेट देतांना केले.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागणयांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी काम बंद करीत संप सुरुच असून आज दि.५ रोजी आमदार समिर कुणावार यांनी आपला जाहिर पाठिम्बा व्यक्त केला.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे,संजय डेहणे,रिपाईचे शंकर मुंजेवार उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सर्वत्र एस टी कामगारांचा संप सुरु असून जवळपास १७१ एसटी डेपोंमधे एस टी चे कामकाज बंद असून एस टी ची प्रवासी वाहतुकव्यवस्थासुद्धा ऐन दिवाळीच्या सणासुदीचे काळात कोलमडली आहे.
आ.समिर कुणावार यांनी संपकरी कर्मचाऱ्यांचे मंडपात भेट दिली असता उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
भाजपा तसेच मित्रपक्षांचे १०५ आमदार एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत असून लवकरच यावर तोडगा निघेल असेही आ.कुणावार यांनी यावेळी सांगितले.
दिवाळीच्या काळात प्रवाश्यांचेसुद्धा मोठे हाल होत असून शासनाने लवकरच तोडगा काढावा अशी आम जनतेचीसुद्धा मागणी आहे.
