एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाविरोधात मनसेचे चंद्रपूर विभाग नियंत्रकांना घेराव

शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी मनसेचा कर्मचाऱ्यांना पाठिंबा.

राज्यपरिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी चंद्रपूर आगारचा कर्मचाऱ्यांनी २७ नोव्हेंम्बर पासून चंद्रपूर येथे आंदोलन सुरू केले. एन दिवाळीच्या आधी आंदोलन करीत असलेले कर्मचारी हे आपल्या हक्काच्या मागण्या घेऊन गेल्या चौदा दिवसापासून संपावर गेले आहे.
अत्यल्प पगार तेरा चौदा तास काम करून आर्थिक शारीरिक मानसिक त्रासाने कंटाळलेल्या जवळपास मंडळाच्या ३८ कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केल्याने आर या पार ची भूमिका घेऊन मागण्या मान्य करेपर्यंत उपोषण करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यसरकारला दिला आहे.

परंतु आडमुठी धोरण स्वीकारून राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी व संप मागे घेण्यात यावी यासाठी दबावतंत्राचा वापर करीत मंगळवारी चंद्रपूर येथील १४ कर्मचाऱ्यांचा निलंबनाची आदेश काढण्यात आला व त्यांच्यासह महाराष्ट्रातील ३७६ कर्मचाऱ्याना निलंबित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिलासेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांच्या तर्फे चंद्रपूर येथे बुधवारी उपोशन स्थळी संपकऱ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांना मनसेने पाठिंबा दिला असून मागण्या मान्य करण्यात यावा व निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी चंद्रपूर विभाग नियंत्रकांना घेराव घालण्यात आला.

तसेच येत्या काळात कर्मचाऱ्यांचा मागणीला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
उत्तरप्रदेश च्या मरण पावलेल्या चार शेतकरी व मृतकासाठी महाराष्ट्र बंद करणारे सरकार आता ३८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही गप्प का असा सवाल यावेळी मनसेने केला.