
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर
चंद्रपूर : पहाटे दोन अज्ञात चोरटे पायी चालत जाणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. मंगळवारी सकाळी 2 फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्य मार्गावरील बँक ऑफ इंडियासमोर ही घटना घडली.
स्थानिक पठाणपुरा प्रभागातील रहिवासी सुनीता सुधाकर गंपावार 69 ही महिला मंगळवारी सकाळी मेन रोडवरील बँक ऑफ इंडियासमोर आझाद गार्डनच्या दिशेने जात होती. दरम्यान, दुचाकीवरील अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचली. चैन खेचत असताना महिलेला धक्का दिल्याने खाली पडून जखमी झाली. या संदर्भात शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सध्या चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. चोरी, खून, लूटमार, अत्याचार, घोटाळा, तस्करी, सट्टा, कोंबडी बाजार तेजीत पसरत आहे पण या संदर्भात पोलिस या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे असा शहर वासीयांच्या मनात संभ्रम निर्माण होताना दिसत आहे.
