
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नौकऱ्या गेल्या तर अनेकांना आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागला, यातच माननीय ऊर्जा मंत्र्यानी वीज बिलात सुट देण्याचे आश्वासन सामान्य जनतेला दिले होते परंतु त्यात कोणतीही सूट महावितरणच्या ग्राहकांना देण्यात आलेली नाही. तसेच वाढीव सुरक्षा ठेवीची मागणी केल्याने मनसे तर्फे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
अनेक ठिकाणी लोड शेडिंग चा झटका महावितरण ने दिला आहे. आणि त्यात भर म्हणून महावितरण तर्फे अतिरिक्त सुरक्षा ठेवीची मागणीचे बिल वीज ग्राहकांना पाठविले यामुळे सामान्य जनतेला आर्थिक फटका देण्याचे काम महावितरण व महाविकास आघाडी करीत आहे असा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केला.
यावेळी मनसेतर्फे सुरक्षा ठेवीची मागणी रद्द करण्यात यावी व वीज ग्राहकांना दिलासा द्यावा यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंता याना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, महिला सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा शोभा वाघमारे, विधानसभा संघटक महेश शास्त्रकार, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, मनोज तांबेकर, विवेक धोटे, सुनील गुडे, सुयोग्य धनवलकर, अक्षय चौधरी, राज वर्मा, वाणी सादलावर,चैतन्य सदाफळे उपस्थित होते.
