
(प्राप्तमाहितीनूसार) पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या चकहत्तीबोळी शेतशिवारात आज दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास बोर्डा बोरकर येथील भावाच्या शेतात सिंतळा येथील महिला नामे कांताबाई रामदास चलाख वय ५० वर्ष हि गेली असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने सदर महिलेवर हल्ला चढविला परंतु शेजारी असलेल्या इतर महिलांनी आरडा ओरड केली असता वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला या हल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिला औषधोउपचारासाठी ग्रामीण रूग्नालय पोंभूर्णा येथे पाठविन्यात आले..
