पांढरकवडा येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती साजरी

आज क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या 145 वी जयंतीनिमित्त
पांढरकवडा येथील बिरसा मुंडा चौकातील क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी शिवश्री विठोबा भोयर यांनी सर्वांना इतिहासाचा आढावा दिला व सर्वांना बिरसा मुंडा जयंतीच्या शुभेच्छा दिल्या..

यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री विजय गोडे, सचिव शिवश्री विठोबाजी भोयर , संभाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव शिवश्री राहुल जोगदंडे, शिवश्री दिनेश चौधरी, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे पदाधिकारी प्रशांत करपते, निखिल गुरनुले, सुमित चाटाळे , भूषण निलगिरवार, शुभम वरगांटवार, अंगद गाडगे, प्रसाद पाठक, प्रीतम सोयाम, बादल उईके व सामाजिक कार्यकर्ते संतोष पेंढारवार कार्यक्रमास प्रमुख हे उपस्थित होते..