विद्यार्थ्यांच्या परीश्रमातून फुलला वनराई बंधारा,जि.प. शाळा कसरगठ्ठाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील कसरगठ्ठा येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली असून पाण्याचे संवर्धन करण्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविले जात आहे. बंधाऱ्यामुळे उनाळ्यात अडवलेले पाणी वापरासाठी तसेच प्राण्यांना पिण्यासाठी होणार आहे. नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविल्यामुळे दशक्रिया विधी, ग्रामस्थांना वापरासाठी पाणी तसेच जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही महिन्यासाठी तूर्तास मिटला जाईल. सोबत गावातील असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळीत वाढ होईल.अशा विविध पद्धतीचा यातून मार्ग काढता येईल.

यावेळी मुख्याध्यापक
टेकाम सर,नैताम सर,सिडाम सर,सावसाकडे मॅडम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज कोवे, तथा शाळा व्यवस्थापन समीतीचे सर्व सदस्य व चिमुकले विद्यार्थी उपस्थित होते