
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
आंध्रप्रदेशातील अदिलाबाद येथुन अवैधरित्या गुटखा, पानमसाला सुगंधीत तंबाकु विक्री
करीता यवतमाळ जिल्हयात येत असल्याची गोपनिय माहीती पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांना मिळाली होती.
सदर गोपनिय माहीतीची शहानिशा करुन कार्यवाही करण्याचे आदेश सायबर सेल, यवतमाळ येथील पथकास दिले असता स.पो.नि. अमोल पुरी सायबर सेल यवतमाळ व स.पो.नि. विनोद चव्हान ठाणेदार पारवा यांचे पथकाने प्राप्त गोपनिय माहीतीच्या आधारे अन्न व औषध विभागाचे गोपाल माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह पाटणबोरी ते सदोबा सावळी या मार्गावर सापळा
रचला.सदर कार्यवाही दरम्यान पायलटींगचे वाहन क्र. एम.एच. ०३ झेड २९१६ टाटा सुमो ब माल वाहतुक वाहन क्र.एम.एच. ३७ जे ९५१ महिद्रा पिकअप अशी २ वाहणे शिताफिने ताब्यात घेतली असता, वाहनामध्ये ४ आरोपी होते त्या शेख अब्रार शेख गफार वय( ४७),भिमराव मधुकर उईके वय (३८) मो. अफताब मो. आयुब वय (३१ ) अल्ताफ
अफसर शेख वय( २०) वर्षे सर्व रा. आर्णी यांना ताब्यात घेण्यात आले तर आरोपी न सलिम शेख गफुर वय (४१) शेख मेहबुब शेख सादीक दोन्ही रा. आर्णी हे घटनास्थळा वरुन फरार झाले.वरील आरोपीचे ताब्यातुन माल वाहतुक वाहन महिंद्रा पिकअप मधुन गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाकु असा एकुण १०,८८,४००/- रु चा गुटखा, दोन वाहन किंमत अंदाजे ११,००,०००/- रु, गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाकु लपविण्या करीता खाली कॅरेट ४० नग व नगदी ९०००/- असा एकुण २२,१६,४००/- रु चा मुदेदमाल ताब्यात घेण्यात आला. हि कार्यवाही डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, व पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. के. ए. धरणे अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ यांच्या आदेशाने प्रदिप परदेशी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अमोल पुरी, सायबर सेल, यवतमाळ स.पो.नि. विनोद चव्हान, ठाणेदार पारवा, पो.उप.नि.योगेश रंधे, पो.ह. गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, अजय निंबोळकर,पंकज गिरी,रोशनि जोगळेकर,प्रगती कांबळे व चालक प्रविन कुथे सर्व सायबर सेल , यवतमाळ यांनी पार पाडली.
