
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनात वर्ग ११ वि ची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु हर्षाली साईनाथ हरबडेच्या कवितेची निवड करण्यात आली आहे.
बालकुमार गटातून तिची निवड झाली असून “मानव धर्माची हत्या करू नका” या कवितेचे सादरीकरणाची संधी हर्षालीस मिळाली आहे.
३,४,५ डिसेंबर २०२१ रोजी तिला कविता सादरीकरणासाठी बोलविण्यात आले आहे.शाळेतील कविगटात तिचा नेहमीच उत्तम प्रतिसाद असतो.मराठी विषयाचे तज्ञ शिक्षक शंकर मालखेडे व शाळेच्या प्राचार्य कु मंजुषा दौ सागर यांचे तिला मार्गदर्शक लाभले आहे.शाळेतील सर्व शिक्षकवृंद शेख सर,फुलकर सर,भेदूरकर सर,डाखोरे सर,स्नेहा गौळकार, अस्मिता चौधरी,इतर सर्वांनी तिला खूब शुभेच्छा दिल्या आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची थेट अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निवड होणे ही कौतुकाची बाब आहे.हर्षाली हरबडे च्या निवडीमुळे अनेक बालकवींना प्रेरणा मिळेल व उत्साह येईल,विद्यार्थी शिक्षक पालक व गावकऱ्यांमध्ये तिच्या निवडीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
