
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे गाडी नंबर MH 30 P 3131 टाटा सफारी 16/11/2021 रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पंधरा ते वीस फूट पुलाच्या खाली गेल्याची घटना घडली होती व त्यावेळेस कैलास चंदनखेडे (मांडगाव) हे जागीच मृत्युमुखी पावले होते व त्या अपघाताच्या वेळी असलेले त्यांचे मुले व चालकाचे मित्र सुखरूप असल्याचे समजते. व मंनिषा कैलासराव चंदनखेडे (मांडगाव) यांची अकरा दिवसांपासून नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट चालू होती परंतु आज सकाळी मंनिषा कैलासराव चंदनखेडे (मांडगाव) ची प्राणज्योत गेली. चंदनखेडे व राडे परिवारास पुनस्व दुःखाचे पहाड कोसळले आहे. आज बारा वाजताच्या दरम्यान अंत्यविधी कार्यक्रम मांडगाव येथे करण्यात येत आहे.
