

शेतकर्यांच्या समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू – मनिष डांगे
वाशिम – नादुरुस्त रोहीत्र दुरुस्तीसाठी ८० टक्के विजबिल भरण्याची जाचक अट रद्द करण्यासह सक्तीची विजवसूली आणि शेतकर्यांच्या इतर अनेक समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २ डिसेंबर रोजी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर डफडे वाजवून एकदिवशीय धरणे आंदोलन राबविण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत अमरावती झोनचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. शेतकर्यांच्या समस्या त्वरीत सुटल्या नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डांगे यांनी यावेळी दिला.
निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये, नादुरुस्त रोहीत्र दुरुस्त करण्यासाठी शेतकर्यांना ८० टक्के विज बिल भरण्याची सक्ती बंद करा. नादुरुस्त रोहित्र दुरुस्तीसाठी चालू बिलापैकी किमान ८०% वीजबिल भरण्याचा शासन निर्णय रद्द करा, यासह शेतकर्यांकडून सक्तीने विजबिलाची वसुली बंद करा आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महावितरणविरोधी घोषणा दिल्या. दरम्यान महावितरणचे कार्यकारी अभियंता वैद्य, तायडे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्यासह मोहन कोल्हे, गजानन वैरागडे, अमोल मापारी, प्रतीक कांबळे, महंमद चौधरी, सुनील अवगण, युवराज टोलमारे, संतोष खंडारे, मनीष महल्ले, विनोद सावके, देवा खरे, सुरेश नेहुल, सागर खरे, समाधान खरे, देवानंद खरे, महादेव तनपुरे, ऋषि धोटे, पवन डूबे, नितेश खडसे, प्रकाश कवडे, धम्मा धुळधुळे, महिला सेनेच्या सिता धंदरे, बेबी धूळधुळे, बेबी कोरडे, अंजनाताई घुगे, सुनिता दोड़के, शमानाबी रुकशान शहा, कमल गायकवाड़, रितेश देशमुख, शिवराज टोलमारे, दिनेश बांगर आदींनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान पोलीस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
