वडकी वीज वितरण कंपनीने रोहीत्र बंद करून वीजबीलाच्या वसुलीला केली सुरुवात 🔸शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता रोहीत्र केले बंद

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वडकी वीज महावितरण कंपनीने रिधोरा परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांची शेतातली लाईट रोहीत्र बंद करून गूल केल्याने शेतकऱ्यांन समोर मोठ्या आव्हान उभे राहिले आहे. सविस्तर वृत्त असे वडकी वीज पुरवठा कंपनीने शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना न देता शेतकऱ्यांच्या शेतातली लाईट बंद केली आहे.२० ते २५ वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतातली लाईट बील देण्यात आली नाही व एकाच वेळी शेतकऱ्यांना कुणाला एक लाख तर कुणाला दोन लाख रुपये अशी बील आले आहे तर कुणाला अजूनही शेतातली वीज बील आलीच नाही. तीन वर्षे शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी मुळे सततची ना पीकी व दोन वर्षे कोरोनांचे संकट कोरोना महामारीच्या काळात कित्येक शेतकऱ्यांना पैशाच्या अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. या सगळ्या संकटातून कसातरी शेतकरी सावरला होता कारण या वर्षीही शेतकऱ्यांना नापिकीच आहे परंतु कापसाला ७ ते ८ हजार रुपये भाव मिळत असल्याने थोडाफार शेतकरी समाधानी दिसून येत आहे. परंतु अचानक कुठल्याही प्रकारची माहिती न देता रिधोरा परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातली लाईट बंद केल्याने कोब अवस्थेत असलेले संपूर्ण पीक मरणार असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.वीज बीलाचा भरणा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना किंवा सभा घेऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली नाही. आता रब्बी हंगामातील पेरणीसाठी खर्च करून बसलेल्या शेतकऱ्यांन समोर पुन्हा वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. ऐन हरभरा, गहू कोब अवस्थेत असुन या पिकाला पाणी दिले नाही तर या पिकांचे काय होईल सांगता येणार नाही. रब्बी हंगामातील पिके हातुन जात असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया

आम्हाला कुठल्याही प्रकारची पुर्व सुचना न देता आमच्या शेतातली लाईट वडकी वीज वितरण कंपनीने बंद केली आहे. मागील वर्षी मी शेतातल्या मोटर पंपाचे वीज बील भरले आहे. व मला या चालू वर्षाचे अजूनही वीजबिल दिले नाही व माझ्या शेतातली लाईट बंद केली आहे.माझ्या पिकांचे नुकसान झाल्यास वडकी वीज वितरण कंपनी जबाबदार राहील.

शेतकरी रामेश्वर कोकाटे रिधोरा.

प्रतिक्रिया

आम्हाला वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेश असल्याने आम्ही शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडित करत आहे.
पवन गिरी सहाय्यक अभियंता वडकी