अभिजित आपटे स्विकारणार स्वातंत्र्यवीर सावकरांचा वारसा – हिंदू महासभा

  • Post author:
  • Post category:इतर


पुणे : अभिजित उर्फ बाळासाहेब आपटे पत्रकार लेखक कवी अभिनेता मावळ लोकसभेचे 2014 व 2019 चे उमेदवार, हिंदूत्व रक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा पुढे नेण्यासाठी सरसावले आहेत, मॉसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून अनैतिकतेचा नायनाट केला, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला अशा पुण्यभूमीत पुण्यात हिंदू महासभेचा पहिला महापौर होता.
ती हिंदूशक्ती पुन्हा एकदा संघटीत करण्यासाठी हिंदू महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष मा श्री अरुणजी माळी तसेच मुंबई प्रदेश नेते गणेशजी कदम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच अभिजित आपटे हिंदू महासभेची पुणे जिल्ह्याची जबाबदारी घेणार आहेत.
पुणे पिंपरी-चिंचवड सह पुणे जिल्हा ग्रामीण वर लवकरच हिंदू महासभेचा भगवा फडकेल त्यासाठी आपण हिंदू युवा शक्ती संघटीत करुन ताकद दाखवून देवू असा विश्वास अभिजित आपटे यांनी व्यक्त केला.