
प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी येथील प्रगतिशील शेतकरी एकनाथ साहेबराव करमाळे यांचा पाल्य अजय करमाळे त्याने इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च कृषी अनुसंशोधन मध्ये डेअरी टेक्नॉलॉजी या विषयात 252 गुण मिळवून भारत देशातून ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक तर इतर मधून पाचवा क्रमांक पटकाविला.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे अजय करमाळे हा लहानपणापासूनच त्याच्या अंगी जिद्द ,चिकाटी व परिश्रम या गुणांमुळेच पहिलीपासून तर दहावीपर्यंत तो प्रथम क्रमांक मिळवत होता. पाचवी ते बारावी पर्यंत त्याचे शिक्षण दिनबाई विद्यालय दिग्रस येथे झाले. 12 वी सायन्स मध्ये त्याने नव्वद टक्के गुण प्राप्त केले. व त्यानंतर तो इंडियन कौन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च कृषी अनु संशोधन ‘डेअरी टेक्नॉलॉजी ‘ या विषयाकरिता उदगीर येथे त्याने शिक्षण घेतले.नुकताच निकाल लागताच अजयच्या यशाबद्दल गावातील मित्र परिवार नातेवाईक यांनी त्याचे अभिनंदन केले.
त्याने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील ,आजोबा व ऋषिकेश लुंगे कारंजा, यांना दिले आहे.
