दारूबंदीसाठी बोराठी येथील महिला धडकल्या राळेगाव पो.स्टे. ला वारंवार तक्रार देऊनही पोलीसांची मदत मिळत नाही,बोराटी येथील महिलांचा आरोप :-महिलांनी दिला उपोषनाचा पो.स्टे. ला इशारा :-

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिनांक 9डिसेंबर रोजी राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या बोराठी येथील जवळपास पंचवीस ते तीस महिलांनी राळेगाव पोलीस स्टेशन ला भेट दिली, त्यांचे मनःणे होते की मागील अनेक दिवसांपासून आमच्या बोराठी गावात बऱ्याच घरी दररोज मोठ्या प्रमाणात अवैध रित्या खुलेआम दारूचा व्यवसाय सुरू असल्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे गावातच दारू विक्री जोरात सुरू असल्या मुळे आमचे लहान लहान मुले दारूच्या व्यसनाने ग्रस्त झाले आहे.यामुळे गावात दररोज भांडण तंटे वाढले आहे त्यामुळे आम्ही महिला प्रचंड दुःखात आहो आमच्या गावात सुरू असलेला खुलेआम दारू व्यवसाय बंद व्हावा यासाठी आम्ही वारंवार राळेगाव पोलीस स्टेशन ला तक्रार देत आहो मात्र सुरू असलेला व्यवसाय बंद होत नाही आजच्या तक्रारींवर राळेगाव पोलिसांनी कठोर कार्यवाही केली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही महिलांनी दिला. राळेगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या गावात दोन तीन देशी दारूचे दुकाने दिसत आहे याला परवानगी कोणी दिली ठाणेदाराने दिली कि जमदारांनी दिली असे महिलावर्ग व प्रत्येक गावातील नागरिक बोलल्या जात आहे तरीही यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष एस पी माननीय दिलीप भुजबळ पाटील याकडे लक्ष देतील काय तालुक्यातील जनता बोलल्या जात आहे.