महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथे कलंक चित्रपट प्रदर्शित.

राष्ट्रीय सेवा योजना द्वारा आयोजित, एच.आय.व्ही. एड्स जनजागृती अभियाना अंतर्गत महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदुर येथे आज 5 ऑगस्ट 2022 रोजी “कलंक – दी इन्फॉर्मेशन ऑफ एच.आय.व्ही. एड्स” हा डॉक्युमेंटरी चित्रपट प्रदर्शित करून विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यात आला.

या वेळेस उपस्थित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य श्री. रामकृष्ण पटले होते. असेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप घोडीले यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर प्रा. पवन चटारे, लेखक व दिग्दर्शक श्री. अनिकेत परसावार, निर्माता श्री. शुभम झाडे व १५० हून अधिक विद्यार्थी गण उपस्थित होते. “एच.आय.व्ही. चा वाढता प्रादुर्भाव युवा वर्गात वाढत असल्यामुळे त्याला आढावा घालण्यासाठी आम्ही जनजागृती म्हणून हा माहितीपट बनवला आहे. तसेच गावोगावी, शाळेत जाऊन, प्रोजेक्टरच्या माध्यमाने आम्ही स्वत: समोरून पुढाकार घेऊन लोकांमध्ये, तरुण पुरुष स्त्रियांमध्ये जनजागृतीचा हा कार्यक्रम राबवत आहोत.”असे कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी आपले मत व्यक्त केले. चित्रपट पाहिल्या नंतर विद्यार्थ्यांना त्यांचा प्रतिसाद विचारल्यावर त्यांनी सांगितले की संपूर्ण माहिती आम्हाला या चित्रपट पाहाल्याने कळाली आहे. शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. चेतन वैद्य यांनी केली.