24 तासात 2 कोरोना बाधितांचा मृत्यु,168 नवीन बधितांची नोंद

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर,चंद्रपूर

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 2 कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. ज्यामुळे मृतांची संख्या 308 वर पोहोचली आहे. बुधवारी बाधितांची संख्या 20,283 वर पोहोचली. 168 कोरोना बाधित त्यात नवीन आढळले. गेल्या 24 तासांत 162 बाधित कोरोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
सुरुवातीपासून स्वस्थ झालेल्या बाधितांची संख्या 18,066 वर आहे. सध्या 1909 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,51,900 लोकांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 1,29,371 नमुने निगेटिव आढळले आहेत.
बुधवारी मृत्यु झालेल्या मृतांमध्ये वरोरा शहरातील 48 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर तहसीलच्या घंटा चौकी परिसरातील 47 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 308 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 285, तेलंगणातील 1, बुलढाणा 1, गडचिरोली 14, यवतमाळ 5, भंडारा 1, वर्धा 1 बाधितांचा समावेश आहे.