चंद्रपूर मध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं होतं. अशातच आता नगरपंचायतीसाठी निवडणुकीसाठी मतदान प्रकिया पार पडत आहे.
चंद्रपुरात देखील आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच आता निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागल्याची माहिती समोर आली आहे.
ऐन निवडणुकीत भाजपच्या जिल्हा महामंत्र्याच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर चंद्रपुरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने पोलिसात तक्रार केली होती. काँग्रेसच्या विजय बावणे आणि नितीन बावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता या पिता पुत्रांना अटक करण्यात आली आहे.
एकीकडे भंडाऱ्यात नाना पटोले यांच्याविरोधात बंडखोरी करण्यात आली आहे. तर चंद्रपुरात भाजपने काँग्रेसचा पत्ता कट केलाय. त्यामुळे आता या दोन्ही घटना काँग्रेससाठी मोठा असल्याचं मानलं जातंय. चंद्रपुरात 6 नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे.
दरम्यान, द्रपुरात आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चंद्रपुरात माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात मुकाबला पहायला मिळतोय. त्यामुळे आता चंद्रपूरात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.