
गायत्री फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिग्रस – काळी दौ.येथील युवकाची वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. व या आत्याचारापासून बंजारा समाज मनसुन्न झाले. या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी बंजारा समाजाचे गोरसेना संघटन यांनी न्याय मिळावा म्हणून जनआक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद येथे दि.१७ डिसेंबर २०२१ ला काढण्यात आला. या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे सर्व संघटनांनी सहभाग नोंदविला होता.
परंतु प्रशासनाने त्यांच्यावर १४४ कलमांचे उल्लंघन केल्याबाबत जवळपास गोरसेनेचे ५०० कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल केला.बंजारा समाजावरील अत्याचारासाठी व समाजाकडून जन भावना दुखावल्या म्हणून हा जनआक्रोश मोर्चा होता. तेव्हा आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याकरिता शासनाला शिफारस कराल व ५०० लोकांना न्याय मिळवून द्यावे. असे निवेदन गायत्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उत्तम राठोड (एम.डी., एल एल.बी., पी. जी.डी.,एम.एस.) यांनी दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
यावेळी गायत्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उत्तम राठोड (एम.डी. एल.एल.बी., पी.जी.डी.एम. एस.),आदिनाथ खोकले,कैलास राठोड,सुजित राठोड, मनीष पवार,गजानन राठोड, पियुष चव्हाण, कार्तिक राठोड ,सुमित आडे ,राहुल राठोड सह आदी गायत्री फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
