
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
मागीलकाही दिवसांपासून होतअसलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक भागात पुरसदृशय परिस्थिती निर्माण झाली त्यात अनेक गोरगरीब व शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झाले त्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्य मंत्री व विरोधीपक्ष नेते मा अजित दादा पवार दि २९ जुलाई २०२२ ला यवतमाळ जिल्ह्य़ात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी कळविले आहे दुपारी ३.४५ वाजता राळेगाव तालुक्यातील झाडगांव व त्यानंतर मारेगाव तालुक्यातील दापोरा, चिंचमंडळ या गावातील पाहणी करून सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पुरपरिस्थीतीवर चर्चा केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतील व त्यानंतर ची वेळ ही कार्यकर्त्यांसाठी राखीव असेल असे वसंतराव घुईखेडकर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तथा उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक यांनी कळविले आहे.
