
महागाव :- संजय जाधव
नववर्षापूर्वीच ग्रामीण रुग्णालय सुरू होणार ; पत्रकार महासंघाचा विजय ; आंदोलन स्थगित !
बहुप्रतिक्षित असलेल्या महागाव ग्रामीण रुग्णालय डिसेंबर अखेर सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आमदार नामदेव ससाणे आणि पत्रकार महासंघाच्या शिष्ठ मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २१ डिसेंबर पर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आंदोलनकर्त्यांना वेळ मागितला.त्यामुळे पत्रकार महासंघाने आमरण उपोषणाची जिल्हा शल्य चिकित्सक , विधानसभेचे आमदार नामदेव ससाणे, भाजपा लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी उपोषणकर्ते यांना शरबत पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
पत्रकार महासंघाचा एकजुटीचा हा महविजय मानला जात असून लवकरच गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामीण रुग्णालयात रुजू होणार आहे .
जुलै २०१८ मध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.कोट्यावधी रुपये खर्च वर्षभरात ग्रामीण रुग्णालयाची टोकदार इमारत पूर्ण झाली. तात्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी किरकोळ त्रृट्यांचा हवाला देत रुग्णालयाची इमारत उद्घाटन आणि हस्तांतरणामध्ये खोडा घातला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय चार वर्षात एकही रुग्णावर उपचार करण्यात आले नाही.पत्रकारांनी बातम्यांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.परंतु बधीर शासनाला आणि प्रशासनाला ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा मुहूर्त मिळाला नाही.हे विद्यमान आमदार आणि खासदार यांचं अपयश मानल्या जात असल्याची ओरड होती.बातम्यांनी प्रशासनावर कोणताही परिणाम झाला नसल्याने महागाव तालुका पत्रकार महासंघाने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
२० नोव्हेंबर पासून महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने तहसील समोर आमरण उपोषण सुरू केल्याने अनेक सामाजिक संघटनांनी महासंघाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
आंदोलनाचा विस्पोट होत असल्याने प्रशासनाच्या पाया खालची वाळू सरकली.प्रचंड दबाव निर्माण होत असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे संकेत निर्माण झाल्याने आमदार नामदेव ससाणे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक ,प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे कक्षात पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर , गजानन वाघमारे , संजय भगत ,रियाज पारेख, विनोद कोपरकर , मंचक गोरे, विवेक पांढरे, या महासंघाच्या शिष्ठ मंडळाची बैठकिची समवेत घडवून आणली .त्यामध्ये तासभर चाललेल्या चर्चेत पत्रकार महासंघ ग्रामीण रुग्णालयात तात्काळ सुरू करण्यावर ठाम राहिली.चर्चे अंती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी महासंघाच्या शिष्टमंडळाला वेळ मागितला.२१ डिसेंबर पर्यंत पदभरती करून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात येईल आणि किरकोळ कामाचे तात्काळ काम सुरू करण्यात येईल अशी हमी दिल्याने पत्रकार महासंघाने आंदोलन तात्पुरते मागे घेतले.नवीन वर्षापर्यंत ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार महासंघाने दिला.उपोषण मंडपात मान्यवरांच्या हस्ते गजानन वाघमारे,गणेश भोयर, विनोद कोपरकर, संजय कोपरकर,पवन रावते, नरेंद्र नप्ते,अमोल राजवाडे, एस के शब्बीर, मनोज सुरोशे, किशोर राऊत, रवि वाघमारे,उपोषणकर्ते यांना निंबु शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते संभाजिदादा नरवाडे , माजी आमदार विजयराव खडसे,भाजपा तालुकाध्यक्ष दीपक आडे,माजी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर , माजी सभापती डी.बी.नाईक , रमेश चव्हाण , आदी उपस्थित होते.
