दिग्रस नपच्या निधीचा अपहार ,नगराध्यक्षांची मुख्याधिकारी विरुध्द तक्रार.

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) 

         मुख्याधिकारी व संगणक अभियंता यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक यांना विश्वासात न घेता हरितपट्टा विकासकामातील ५३ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार नगराध्यक्षा सदफजहाॅ मो.जावेद यांनी सोमवार, २० जानेवारीला केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

          नागपूरच्या रेनबो ग्रीणर्स या कंपनीने दिग्रस शहरात वृक्षारोपण व संवर्धनाची कामे केली.संगणक अभियंता स्वप्नील पवार यांच्या देखरेखीत हे काम करण्याच्या सुचना होत्या.२ हजार ६५० या प्रमाणे एकूण ५३ लाख रुपयांची योजना राबविण्याचे ठरले होते.कंत्राटदाराने वृक्षारोपण केल्याचे नगर परिषदेला कळविले.स्वप्नील पवार यांनी पदाचा गैरवापर करुन कागदोपत्री काम करुन, देयकापोटी कंत्राटदाराला ५३ लाख रुपयांची उचल करुन दिली.

           प्रत्यक्षात वृक्षारोपण न झाल्याने लोकांनी नगराध्यक्षांकडे तक्रार दिल्या, त्यावर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.मुख्याधिकारी शेषराव टाले, संगणक अभियंता स्वप्नील पवार यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात आली १ जानेवारी २०१९ रोजी याबाबत चौकशी समिती स्थापन केल्याचे नगराध्यक्षांना सांगण्यात आले मात्र ही चौकशी समिती ही केवळ कागदोपत्रीच दाखविल्याचे नगराध्यक्षांनी तक्रारीत नमूद केले आहे या योजनेतील कंत्राटदार मुख्याधिकारी व अभियंता यांनी बनावट कागदपत्र तयार करून शासकीय निधीचा अफरातफर केल्याचा आरोप नगराध्यक्षा सदफजहाॅ मोहम्मद जावेद यांनी केला असून या बाबतीत दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

          चौकट □

आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीस तयार आहोत- मुख्याधिकारी टाले       वृक्षारोपण कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, जावेद पहेलवान यांच्या विरुद्ध पोलीसघ ठाण्यात ३५३ दाखल केल्याने, त्यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे,आम्ही सर्व प्रकारच्या चौकशीस तयार असल्याचे मुख्याधिकारी शेषराव टाले म्हणालेत.