शिवशक्ती क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

कीन्ही जवादे येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे,माजी उपसरपंच रामदास माणगी जी.प.शाळा मुख्याध्यापक होरे सर,चाचोरा गावाचे उपसरपंच मांदाडे,यांचे हस्ते पार पडले.पहीले पारितोषिक जरूर तरंग,दुसरे पारितोषिक खडकी,तिसरे पारीतोषिक कीन्ही जवादे तर चवथे पारितोषिक मुरपाड या गावाच्या संघाला मीळाले.शिवशक्ती क्रीडा मंडळ चे अध्यक्ष संगीत धाबेकर, प्रसाद नीकुरे, पवण खैरकार, अविनाश गानफाडे,साधु सीडाम.संदीप ,रवी ठाकरे,काॅमेंटेटर देवा ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.