
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
उद्धार बहुउद्देशीय संस्था यवतमाळ व सहयोगी संस्था हॅबिटेट फॉर ह्युमिनिटी फॉर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आदरणीय सुनीलभाऊ भेले यांच्या पुढाकाराने गट ग्राम पंचायत वालधुर अंतर्गत कोपरी, इंझापूर व वालधुर येथील १०१ गरीब व गरजू कुटुंबाना धान्य किट चे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील अनुसूचित जाती, जमाती,ओबीसी,इतरही वर्गातील अतिशय गरीब व गरजू कुटूंबाना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही अशा लोकांची ग्रामपंचायतीच्या वतीने कोपरी,वालधूर,इंजापूर या तीनही गावातील यादी तयार करून १०१ कुटुंबाना धान्य किटचे वाटप करण्यात आले यावेळी उद्धार बहुउद्देशीय संस्थचे संचालक वैभवभाऊ मुन, केन सर ( अमेरिका) संचालक सुनीलजी भेले,संचालिका वंदनाताई भेले, तसेच सरपंच प्रवीणभाऊ नरडवार,उपसरपंच देवकाबाई भोयर,माजी सरपंच प्रेमानंदभाऊ भेले,सुवेधभाऊ भेले,ग्रामपंचायत सदस्य शंकरभाऊ पराते,सदस्य मारोतरावजी आडे,सदस्या सुरेखाजी येरकाडे, सदस्या रंजनाताई सावज, सदस्या शीतलताई कुळसंगे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
