आम्ही साऱ्या सावित्री ( पारधी मुलीचं वस्तिगृह ) येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती केली साजरी

आम्ही साऱ्या सावित्री या दुर्गम भागात पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मा.इश्यु माळवे आणि त्यांची पत्नी सौ पपिता माळवे कुटुंब पारधी समाजातील मुली चे वसतीगृह सांभाळते आहे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मुलांचा आणि मुलींचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी वसतिगृहाची व्यवस्था केली होती

अशा छत्रपती शाहू महाराज या लोकराजाच्या जयंतीनिमित्त “‘ आम्ही साऱ्या सावित्री “‘ वस्तिगृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला उपस्थित मा गोविंद चव्हाण,मा.कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ हे उपस्थित होते कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच श्रीमती लताबाई पवार ह्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ पपिता माळवे संयोजक- आम्ही साऱ्या सावित्री च्या अधिक्षिका यांनी केले होते या जयंतीनिमित्त वस्तिगृहातील विद्यार्थीनी पायल पवार ही दहावी परिक्षा उत्तीर्ण झाली म्हणून तिचा सत्कार करण्यात आला होता आणि मान्यवरांचे मार्गदर्शन करण्यात आले होते आणि समाजातील उपस्थित मुलिना खाऊ वाटप म्हणून बिस्किटे चाकलेट वाटप करण्यात आले होते

समाजातील शिक्षणाची दैना अवस्था कठीण आहे परंतु आता आपल्या समाजातील मुलींना शिक्षण दिले पाहिजे चांगले संस्कार व्हावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते आपल्या वस्तिगृहात येवून सामाजिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन करतात ही आपल्या साठी गौरवास्पद बाब आहे अशा प्रतिक्रिया कु मालिनी पवार नर्सिंग ची विद्यार्थिनी हीने समाजाच्या वतीने दिल्या होत्या या कार्यक्रमाचे आयोजन आणि सुत्र संचालन संयोजक इश्यू माळवे यांनी केले होते