क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतनिमित्त पांढरकवडा येथे सामान्य ज्ञान स्पर्धा

u

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी ते राष्ट्रमाता जिजाऊ जयंती १२ जानेवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते असते , यावर्षी देखील अखिल भारतीय माळी महासंघाने २ जानेवारी रोजी पांढरकवडा तेथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते..
आज सकाळी 11 वाजता, के,ई, एस,हायस्कूल पांढरकवडा, येथे,अखिल भारतीय माळी महासंघ, पांढरकवडा द्वारा , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त गट (अ) वर्ग 5 ते 8 व गट (ब ) वर्ग 9 ते 12 अशी दोन गटात स्पर्धा परीक्षा ,घेण्यात आली, या स्पर्धेमध्ये अ, गटाकरिता 66 विद्यार्थी व ब, गटाकरिता 142 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी सर्व कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन करून सामान्य ज्ञान परिक्षा झाल्याची माहिती माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष राम भेंडारे यांनी दिली.