

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक विहिरी जमीनदोस्त होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे सतंतच्या मुसळधार पावसाने अंखा राळेगाव तालुका झोडपून काढला आहे.सदर यामध्ये नदी नाल्याच्या काठचे संपूर्ण शेत पीका सह खरडून नेली आहे तर शेकडो घरांची पडझड झाली आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण मातीच खरडून नेली आहे.सदर अशी परस्थिती सध्या तालुक्यातील झाली आहे.तर सदर अशाच परिस्थितीत पुन्हा एक संकट शेतकऱ्यांनवर आले आहे सतंत २० ते २५ दिवसांच्या पावसाने शेतातील विहीरी तुडुंब भरून पाणी विहीरीच्या बाहेर निघतांना दिसून येत आहे. सदर राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण जमीन दलदल झाली आहे सदर संपूर्ण जमीन दलदल झाली असल्याकारणाने रिधोरा परिसरातील अनेक विहिरी जमीनदोस्त झाल्या आहेत यात खडकी येथील शेतकरी योगेश देविदास तेलतुंबडे गटनंब १८/१ तर सुहास आडकुजी तेलतुंबडे गटनंब ५२/ तर रिधोरा येथिल शेतकरी विजय जवादे यांची विहीर जमीनदोस्त झाली आहे सदर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोक्का पाहणी करून नुकसानभरपाईची मागणी वरील शेतकरी योगेश देविदास तेलतुंबडे, सुहास आडकुजी तेलतुंबडे, विजय जवादे यांनी केली आहे.
पोलीस पाटील
मी गावचा पोलिस पाटील या नात्याने तलाठी यांना तोंडी माहिती दिली होती परंतु अजूनही तलाठ्याने पंचनामा केला नाही. मी पोलिस पाटील असुन सुद्धा माझ्या सांगण्यावरून महसूल विभाग पंचनामा करत नाही तर सर्व सामान्य माणसाला काय न्याय देवू शकतो? मी जिल्हा अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार सादर करणार आहे
सुहास आडकुजी तेलतुंबडे पोलिस पाटील खडकी
