
महिलांना स्त्री शिक्षणाची कवाडे उघडणारी ,स्त्रियांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा खडतर मार्ग स्वीकारून स्त्रियांना स्त्री शिक्षणाचे महत्व सांगणारी ,त्यांना शिक्षित करणारी शिक्षिका ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 3 जानेवारी रोजी जयंती निमित्त पहापळ येथे अखिल भारतीय माळी महासंघ व इतर समाज संघटनेतील पदाधिकारी यांनी सावित्री बाई व ज्योतिराव फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, दिक्षा गुरनुले, समिक्षा चौधरी यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनकार्याचा आढावा देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी शत्रुघ्न चाटाळे,रामदास गुरनुले , नामदेव पेटकुले, सुभाष चौधरी, तानबा चौधरी, जिवन चाटाळे,दत्ता शेंडे, राजू बोईनवार,महेश चौधरी, विलास चाटाळे,लक्ष्मण गुरणुले, बबन गुरणुले, नितेश चाटाळे, किशोर गुरणुले व भगिनी रत्नमाला मोहूर्ले, आरती चाटाळे, वेणू गुरणुळे, ताई चाटाळे व युवक लखन चाटाळे ,गणेश शेंडे , मोहन पेटकुले, सुमित चाटाळे, धीरज चाटाळे, अनुप डहाके,गणेश गुरणुले प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या..
