क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर तर्फे शिक्षिकांचा सत्कार

आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीमाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बल्लारपूर शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अर्चना ताई बुटले यांनी केले.
सत्कार कार्यक्रम आदरणीय प्रदेशा अध्यक्ष. रुपाली ताई चाकणकर यांच्या सुचनेनुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष. सौ.बेबीताई ऊएके मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला,शुभांगी साठे विधानसभा अध्यक्ष,अर्चना बुटले शहराध्यक्ष,मल्लेश्वरी महेश कर उपाध्यक्ष, माया सातपुते उपाध्यक्ष,लीना कुसराम महासचिव,कविता बुचुंडे महासचिव, सपना गडेकर महासचिव,लक्ष्मी युएके कोषाध्यक्षबल्लारपूर शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चे इंजि. राकेश सोमानी, अध्यक्ष बादल भाऊ उराडे, उपाध्यक्ष आरिफ खान, युवक शहर अध्यक्ष रोहन जामगडे, जितेश पिल्ले,सुमित(गोलू)डोहणे,अंकित निवलकर, , व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
व शिक्षिका सिटी कॉन्व्हेंट बल्लारपूर,
जोसफ मॅडम, वाटेकर मॅडम, जोशना मॅडम वनकर मॅडम मोहरले मॅडम काजल मॅडम रेणुका मॅडम…
अंगणवाडी शिक्षिका
वंदनाताई मुळे योगिता देवाळकर
पोद्दार स्कूल
नेहा महेश कर मॅडम इत्यादी उपस्थित होते.